सरकार विरोधात मविआचे ‘जोडे मारो आंदोलन’ ; मविआचे नेते सरकारविरोधात एकवटले, येत्या 1 सप्टेंबरला…

Udhav Thackeray on State Govt । सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. या घटनेनंतर आता राज्यातील राजकारण पेटले आहे. आज मालवणमध्ये ठाकरे गट आणि राणे गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. या सर्व परिस्थितीत आता महाविकास आघाडीने राज्यसरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी येत्या रविवारी सरकारविरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
‘त्या’ मोर्चात मोदी, शहांचे दलाल आणि शिवद्रोही Udhav Thackeray on State Govt ।
मातोश्रीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला . यावेळी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी,“हे महाफुटीचं सरकार आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कारभाराने किळस आणली आहे. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता. पण कोर्टाच्या माध्यमातून त्यावर बंदी घातली होती. मालवणमध्ये पुतळा कोसळला. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजित केला. त्या मोर्चात मोदी आणि शहांचे दलाल आणि शिवद्रोही आले. ते शिवद्रोही आहेत” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नारायण राणे, निलेश राणे यांच्यावर टीका केली आहे.
मालवणात राजकोट किल्ल्यावर आज मोठा राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आले होते. त्यावेळी हा गोंधळ झाला. राणे समर्थक मुख्य द्वारावर जमले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंची वाट अडवून धरली होती. अखेर पोलीस बंदोबस्तात दीड तासानंतर आदित्य ठाकरे खाली उतरले.
“1 सप्टेंबरला जोडे मारो आंदोलन करणार” Udhav Thackeray on State Govt ।
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “वाऱ्याने पुतळा पडला कारण हे निर्लज्जपणाच कळस गाठणारं सरकार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, चांगलं घडेल” असे म्हटले. पुढे बोलताना त्यांनी “1 सप्टेंबरला दुपारी ११ वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून. गेटवेला शिवाजी महाराजाचां पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि सरकारला जोडे मारो आंदोलन करू. मी आहे तिथे. पवारसाहेब असतील नाना पटोले असतील. सर्व शिवप्रेमींनी यावं अशी विनंती आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “भाजपच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट पटली असेल असं वाटत नाही. ते शिवद्रोही होते तिथे. एकएकाला बघतो असं या शिवद्रोहींनी म्हटलं त्यांचे चेहरे समोर आले” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘कोर्ट महाराष्ट्राचं असेल किंवा कोलकात्याचं, मी लक्ष ठेवतोय’
“आम्ही सरकारच्या प्रतिमेला जोडे मारणार आहोत. सरकारची महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा गडद होत आहे. कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केला होता. त्यांना तरीही हटवलं नव्हतं. म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलेला आहे. तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही. कोर्ट महाराष्ट्राचं असेल किंवा कोलकात्याचं. मी लक्ष ठेवतोय. ज्यांनी बंद बेकायदेशीर ठरवला. ते भाजपवर काय कारवाई करतोय ते पाहू” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा
“आमच्या नेत्यांच्या केसाला धक्का बसला तर बघा…”; सुप्रिया सुळेंचा इशारा





