दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली: शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Updated On:

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत शेतकऱ्यांची तातडीने कर्जमुक्ती आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी केली. यास नकार दिल्यास मराठवाड्यासह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

शिंदेंवर टीका, भाजपवर हल्ला –

पक्षातील फुटीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेकांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. काहींना पळवले, पण ते पितळ होते, सोनं माझ्याकडेच आहे.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी ‘भगवी शाल पांघरलेले गाढव’ अशी खरमरीत टीका केली. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ओला दुष्काळ’ ही संज्ञा नाकारली होती, यावर ठाकरे म्हणाले, “निकष खड्ड्यात घाला आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करा.” आपल्या कार्यकाळातील कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची योजना गद्दारांमुळे अपूर्ण राहिल्याचा आरोपही त्यांनी केला.

संघाला 100 वर्षे, भागवतांना सवाल –

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बोलताना ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट सवाल केला. “संघाच्या मेहनतीला लागलेली विषारी फळे (भाजपचे राजकारण) तुम्हाला मान्य आहेत का? मोहन भागवत मुस्लिम धर्मगुरूंच्या भेटी घेतात, त्यांना हिंदुत्व सोडले असे म्हणण्याची हिंमत भाजपमध्ये आहे का?” असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मणिपूर, लडाख आणि जनसुरक्षा विधेयक –

मणिपूर तीन वर्षांपासून अशांत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका ठाकरे यांनी केली. लडाखमधील सोनम वांगचूक यांना तुरुंगात टाकण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, जनसुरक्षा विधेयकाला तीव्र विरोध करत त्यांनी जनतेला या कायद्याविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले.

मुंबई आणि मराठी अस्मिता –

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी भाजपला ‘अमिबा’ (एकेपेशीय प्राणी) संबोधत टीका केली. “भाजप मुंबईकडे व्यापारी नजरेने पाहतो, आम्ही तिला आमचा जीव मानतो,” असे ते म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या खात्यात पैसे टाकून ‘पगारी मतदार’ तयार करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. “बिहारमध्ये महिलांना 10 हजार रुपये दिले जातात, पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांच्यासोबत युती?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, “5 जुलैला आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी. मराठी माणसात फूट पडू देणार नाही.” मराठी भाषेवर हिंदीची सक्ती सहन केली जाणार नाही, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. “मराठीला हात लावून दाखवा, हात जागेवर ठेवणार नाही,” असे ते ठणकावून म्हणाले.

पंतप्रधानांवरही टीकास्त्र –

आशिया कप जिंकल्यावर क्रिकेटची तुलना युद्धाशी करणाऱ्या पंतप्रधान मोदींवर ठाकरे यांनी टीका केली. “पहलगाममध्ये धर्म बघून गोळ्या घालण्यात आल्या. तुमच्या देशात हिंदू सुरक्षित नाहीत. बाप हिंदुत्वाचे ढोंग करतो आणि पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

आंदोलनाचा इशारा –

भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. “शेतकऱ्यांची त्वरित कर्जमुक्ती आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर न झाल्यास मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात मोठे मोर्चे काढू आणि रस्त्यावर उतरू,” असे त्यांनी ठणकावले.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भाषणाने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा! 'इतके' नगरसेवक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पडद्यामागच्या राजकारणाची चर्चा

2026-07-10 11:32:44

Maharashtra Politics : ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा! 'इतके' नगरसेवक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पडद्यामागच्या राजकारणाची चर्चा

Shevgaon News : शेवगाव तालुक्यात खरिपाच्या पेरण्या आटोपल्या, मात्र खरीप हंगाम धोक्यात; शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

2026-07-09 21:46:17

Shevgaon News : शेवगाव तालुक्यात खरिपाच्या पेरण्या आटोपल्या, मात्र खरीप हंगाम धोक्यात; शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

Top 10 News : ठाकरेंनंतर आता शरद पवारांनाही धक्का? ते अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटला...; वाचा आजच्या दहा बातम्या

2026-07-09 19:06:37

Top 10 News : ठाकरेंनंतर आता शरद पवारांनाही धक्का? ते अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटला...; वाचा आजच्या दहा बातम्या

Top 10 News : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा ते डॉक्टरांना मारहाण भोवली..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या

2026-07-08 19:12:08

Top 10 News : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा ते डॉक्टरांना मारहाण भोवली..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या

Pune Gramin : घोडनदीला महापूर, शेतीसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान

2026-07-08 17:06:19

Pune Gramin : घोडनदीला महापूर, शेतीसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान