Uddhav Thackeray : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी राजकीय घडामोडी जोरात सुरू झाल्या आहेत. राज्यसभेसाठी हक्काची जागा सोडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात खदखद सुरू असतानाच, आता विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना संधी देण्यासाठी महाविकास आघाडीत ‘फिल्डिंग’ लावण्यात येत आहे. १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. निवडणूक लवकरच होणार असल्याने सत्तेच्या सारीपाटावर गणिते मांडली जात आहेत आणि डावपेच आखले जात आहेत. समारोपाच्या कार्यक्रमात चिमटे आणि शेरोशायरी Uddhav Thackeray माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह इतर आमदारांना विधान परिषदेतून निरोप देण्यात आला. यासाठी आयोजित समारोप कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तशाच पद्धतीने राज्यातील विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांना निरोप दिला. पण खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधले ते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जुगलबंदीने. उद्धव ठाकरे यांनी शेरोशायरीतून विधानसभेचे वातावरण हलकं-फुलकं करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत चिमटेही काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या कृतीचे कौतुक केले. ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा उद्धव यांनी चांगल्या पद्धतीने पुढे नेला आहे.” Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंना विधान परिषदेचे तिकीट मिळणार? Uddhav Thackeray विधान परिषदेतील ९ जागा एका महिन्यानंतर रिक्त होत आहेत. यापैकी ८ जागांवर सत्ताधारी महायुतीचा विजय जवळपास पक्का मानला जात आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या पारड्यात मात्र फक्त एका जागेचे वजन पडेल. महायुतीने जर नऊही जागांवर दावा सांगितला तर एका जागेसाठी चुरस निर्माण होईल. क्रॉस वोटिंगची भीतीही व्यक्त केली जात आहे. राज्यसभा फॉर्म्युला विधान परिषदेतही लागू करण्याची मागणी Uddhav Thackeray राज्यसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक होत्या. पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची बाजू उचलून धरली आणि आपला हक्क सोडला. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसचे मन वळवता आले आणि महाविकास आघाडीच्या खात्यातील एक जागा शरद पवार यांना मिळाली. आता हाच फॉर्म्युला विधान परिषदेसाठी लागू करण्याची उद्धव गटाची मागणी आहे. यापूर्वी खासदार संजय राऊत यांनीही “शरद पवार यांना राज्यसभा द्या आणि विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडा” अशी मागणी केली होती. कुणाचे पारडे जड? महाविकास आघाडीची आकडेवारी पाहता चित्र स्पष्ट होत आहे. काँग्रेसकडे १६ आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १० आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सर्वाधिक २० आमदार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी २९ आमदारांच्या मतांची गरज असते. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आता बदल्यात उद्धव सेनेला पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेतील एंट्री पक्की मानली जात आहे. काँग्रेसचे १६ आणि उद्धव ठाकरे यांचे अतिरिक्त एक मत मिळून महाविकास आघाडीकडे १७ मतांची मोट तयार होईल. जर महाविकास आघाडीने गेम पालटवला आणि १० मतं खेचून आणली तर त्यांचे दोन आमदार (Uddhav Thackeray) निवडून येऊ शकतील. मात्र ही शक्यता अत्यंत धूसर मानली जाते. उलट एकनाथ शिंदे गटातील एखादा आमदार अधिकचा निवडला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. पडद्याआड मोठ्या घडामोडी घडत असल्याचे समजत आहे.