Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे करणार बीड, परभणी दौरा; सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबीयांची घेणार भेट

Uddhav Thackeray – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येला 19 दिवस उलटले तरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाही.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे बीड आणि परभणी दौरा करणार आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात अनेकजण सहभागी झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंपासून ते अंजली दमानिया यांच्यापर्यंत अनेक जण बीडमध्ये भेटी देत आहेत.
अशात जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.





