Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ म्हणाले “जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर….”
Uddhav Thackeray : भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray : भारतीय कामगार सेनेची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दादर येथील शिवाजी मंदिरात पार पडली. या सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात कामगारांच्या प्रश्नांसह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकेची तोफ डागली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी कामगार सेनेच्या 58 वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख करत, “या काळात आम्ही कधीच कामगारांचा विश्वासघात केला नाही,” असे ठामपणे सांगितले. दत्ता साळवी यांच्या योगदानाची आठवण करून देताना ते म्हणाले, त्यांनी (दत्ता साळवी) नोकरीचा राजीनामा देऊन कामगारांसाठी आयुष्य झोकून दिले. “आज काही जण सत्तेसाठी धडपड करत आहेत, पण आमचे नाते हे कंपनीच्या मालकांशी नव्हे तर गेटवर फडकणाऱ्या भगव्याशी आहे,” असा टोला त्यांनी लगावला. (Uddhav Thackeray)
कामगारांच्या स्थलांतराच्या प्रश्नावर भाष्य करताना, “कामगारांना राज्याबाहेर किंवा देशाबाहेर का जावे लागत आहे?” कामगार हा देशाचा ‘भाग्यविधाता’ असल्याचे उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केले. Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ म्हणाले “जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर….”
“देश अराजकतेकडे चालला आहे. ईडीच्या माध्यमातून महिलांना त्रास दिला जातोय, कामगार रस्त्यावर उतरला की त्याला देशद्रोही ठरवले जाते,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत, “जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर संसद भवन उद्घाटन किंवा राम मंदिर सोहळ्याला महिला खासदारांना का बोलावले नाही?” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीसांचे नाव न घेत लगावला टोला (Uddhav Thackeray)
ममता बॅनर्जी वाघिणीसारखी लढतं आहेत. त्या जिंकल्याच पाहिजेत. वल्लभभाई पटेल यांनी देशात काही भाग आणायला फौजा घुसवल्या होत्या व तुम्ही निवडणुका जिंकायला फौजा घुसवत आहात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. बंगालमध्ये तेच चाललंय. तिथं दोन लाखांवर जवान उतरवले आहेत. कोण करतील मतदान तिथं मग? “ड्रग्ज रॅकेट चालले, भोंदू बाबा वाढलेत व तिकडे बंगाल जिंकायला चाललेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नाव न घेता लगावला.
हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवार पुन्हा रुग्णालयात; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती





