Uddhav Thackeray: वाघनखांच्या विषयावरुन उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान चर्चेत, थेट म्हणाले, “त्या नखाला महत्त्व…’

Uddhav Thackeray | Waghnakhe | Sudhir Mungantiwar – छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वाघनखे काही दिवसांपूर्वीच साताऱ्यात आली असून ती छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. हा क्षण राजधानी सातारा आणि तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.
मात्र या वाघनखांवरून संभ्रम तयार करणाऱ्या विरोधकांना याचे महत्त्व कळणार नाही, शिवरायांच्या खऱ्या वाघांचे महत्त्व नकली वाघांना काय कळणार? असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला होता.
मात्र, आता यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आज (दि. ३) पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. तर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील चिमटा काढला आहे.
मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला महाराष्ट्राती काना कोपरा स्वाभिमानाने पेटलेला दिसला पाहिजे. मला संपूर्ण महाराष्ट्रातील दऱ्या खोऱ्यांमध्ये या व्यापारी हुकुमशाहांविरोधात राण किंवा वनवा पेटवलेला पाहिजे. हा वनवा पेटवण्याची ताकद तुमच्यात आहे. कारण तुमच्या हातात तलवार आहे.
मुनगंटवारांनी नाघनखे आणली आहेत. पण अहो मुनगंटीवार, नखाच्या मागे वाघ असतो ना तेव्हा त्या वाघनखांना अर्थ असतो. त्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढलेला आहे की नाही हा विषय वेगळा आहे.
पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता. म्हणून त्या नखाला महत्त्व आहे. त्या नखाच्या मागे मुनगंटीवार असतील तर वाघनखे आणि मुनटंगीवार कुठेतरी जुळतंय का? अशी खोचक टीका यावेळी ठाकरेंनी केली.
हे देखील वाचा….
उद्धव ठाकरेंची जहरी टीका,’अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज’





