उद्धव ठाकरेंना बालेकिल्ला सांभाळण्यात यश; मुंबईच्या सहा जागांवरचा निकाल नेमका काय? वाचा…

Lok Sabha Result 2024 । Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुका एकुण सात टप्प्यात पार पडेल. 19 एप्रिलपासून सुरू झालेली मतदानप्रक्रिया 1 जून रोजी संपली. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला.
अर्थातच त्यानंतर सर्वांच उत्सुकता निकाली लागली होती. तोच लोकसभा निवडणुकीक निकाल आज 4 जून रोजी जाहीर होताना दिसत आहे. देशातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून, बरेच निकाल आता स्पष्ट होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर मतदान पार पडले. सध्या महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसताना दिसतोय. तर, दुसरीकडे आघाडी सरकारने अनेक ठिकाणी विजयाचा गुलाल अंगावर उधळला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला सांभाळण्यात मोठं यश आलं आहे. मुंबईत 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
मुंबईच्या सहा जागांवरचा निकाल नेमका काय?
– दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे उमेदवार होते. तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव या उमेदवार होते. या ठिकाणी अरविंद सावंत हे घवघवीत मतांनी विजयी झाले आहेत.
– दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे ते तिथले विद्यमान खासदार होते. तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे उमेदवार होते. या मतदारसंघात अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.
– उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रविंद्र वायकर उमेदवार होते. तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर उमेदवार होते. अमोल कीर्तिकर यांचा विजय झाला आहे.
– उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाची लढत ही अतिशय अटीतटीची ठरली. अखेर अंतिम क्षणी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा या मतदारसंघात विजय झाला.
– मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला आहे.
– मुंबईतील केवळ एका जागेवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे.





