उद्धव ठाकरे मोदींना म्हणाले,”…तर आम्हीही तुमच्या बरोबर येतो…”; नेमकं का म्हणाले ? असं वाचा

Uddhav Thackeray on Modi । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामला लागलेत. त्यातच महाविकास आघाडीमधील सर्व पक्षदेखील तेवढ्याच ताकदीने तयारीला लागलेत. भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी इंडिया आघाडी देशात काम करतंय. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस पूर्णपाने सज्ज झालंय. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील धारावीत सभा घेतली.त्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? Uddhav Thackeray on Modi ।
साधारण आठ एक वर्षांपूर्वी मोदींनी बिहारच्या लोकांना सांगितलं होतं. ५० हजार कोटींमुळे बिहारचं काही होणार नाही असं मोदी म्हटलं होतं. असं करत करत सव्वा लाख कोटींचं पॅकेज मोदींनी जाहीर केलं होतं. या गोष्टीला आठ वर्षे झाली. आता नितीश कुमारांना विचारा की सव्वा लाख कोटी बिहारला मिळाले का? बिहारच्या जनतेला जर सव्वा लाख कोटी मिळाले असतील तर आम्हीही तुमच्याबरोबर येतो. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
गडकरींचं नाव पहिल्या यादीत का नाही? Uddhav Thackeray on Modi ।
साधी गोष्ट सांगतो भाजपाने १९५ लोकांची यादी जाहीर केली. या यादीत कुणाची नावं आहेत? मोदी-शाह यांची नावं आहेत. आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह नावं माहिती नव्हती. भाजपाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करुन दिली. त्यानंतर त्यांच्याबरोबर आले ते नितीन गडकरी होते. युतीच्या काळात त्यांनी ५५ उड्डाणपूल बांधले, भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असलेला माणूस त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही.
मुंबईतला एक माणूस ज्याच्यावर भाजपाने आरोप केले होते. कृपाशंकर सिंह त्याचं नाव पहिल्या यादीत आहे पण गडकरींचं नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही भाजपाची जाहिरात होती ना.. आता त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय? हा माझा प्रश्न आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मागच्या वेळी युतीने ४२ खासदार आले नसते तर दिल्लीचं तख्त राहिलं नसतं. महाराष्ट्र गीतात म्हटलं आहे त्याप्रमाणे आपल्याला आधी दिल्लीचं तख्त फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिथे निर्माण करावं लागेल. यांची जी काही मिजास आहे अब की बार ४०० पार मी म्हणतो अब की बार भाजपा तडीपार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.





