उद्धव ठाकरेंनी घेतली केसीआर यांची भेट; सोबत होते तेजस ठाकरे? चर्चांना उधाण

Updated On:
Photo 1

मुंबई – एनडीएमधून बाहेर झाल्या पडल्यापासून शिवसेनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. याआधी उद्धव ठाकेर यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली होती. आज उद्धव य़ांच्या भेटीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली. मात्र ही भेट उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले त्यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे उपस्थित असल्याने लक्षवेधी ठरली.

देशभरात पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याबाहेर आपली ताकद आजमावून पाहत आहे. त्यातच चंद्रशेखर राव यांनी राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

चंद्रशेखर राव यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रशेखर राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या तेजस ठाकरे उपस्थितीत होते. त्यामुळे तेजस ठाकरेंची राजकारणात इंट्री होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.

यावेळी टेबलवर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, चंद्रशेखर राव आणि तेजस ठाकरे होते. तेजस यांनी आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या संशोधन आणि कार्याबद्दलची माहिती केसीआर यांना दिल्याचं सांगण्यात येत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sanjay Raut : दिशा सालियन प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप; नितेश राणेंच्या विधानावर राऊतांचा बोचरा पलटवार

Sanjay Raut : दिशा सालियन प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप; नितेश राणेंच्या विधानावर राऊतांचा बोचरा पलटवार

Shiv Sena Verdict : शिंदेंना 'या' 3 कारणांमुळे मिळाला पक्ष; ठाकरेंचा 'तो' दावा खोडत शिंदेच्या वकिलाचा कोर्टात मोठा युक्तिवाद

Shiv Sena Verdict : शिंदेंना 'या' 3 कारणांमुळे मिळाला पक्ष; ठाकरेंचा 'तो' दावा खोडत शिंदेच्या वकिलाचा कोर्टात मोठा युक्तिवाद

Shivsena Hearing: शिवसेना कुणाची? पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी

Shivsena Hearing: शिवसेना कुणाची? पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी

Shivsena UBT : मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर

Shivsena UBT : मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर