“सोनम वांगचूक देशद्रोही असतील तर, पाकिस्तानला जाऊन केक खाणारे मोदी कोण?”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

Updated On:

Uddhav Thackeray | Sonam Wangchuck : दसऱ्यानिमित्त आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होत आहे. एकीकडे या मेळाव्याची तयारी केली जात होती, तर दुसरीकडे मुंबईत पावसाने ठाण मांडले होते. त्यामुळे ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पासवाचे सावट आले होते. हा मेळावा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

दरम्यान, आता पावसाला न जुमानता ठाकरे यांच्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक हजर झाले आहेत. आपल्या या मेळाव्यात ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी सोनम वांगचूक यांच्या अडकेवर देखील भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सोनम वांगचूक एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोह ठरवण्यात आले. मग गुपचूपपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी कोण? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

तीन वर्षे मणिपूर जळत होते, पण आता मोदी मणिपूरला गेले. त्या नावातील मणी यांना दिसला, पण त्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत. असं देखील ते यावेळी म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता. पावसाचे वातावरण आणि सर्वत्र चिखल असूनही लाखो शिवसैनिकांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली.

का झाली सोनम वांगचुक यांना अटक?

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्ते ‘सोनम वांगचुक’ यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या 15व्या दिवशी लेह येथे हिंसक प्रदर्शनं झाली. यानंतर वांगचुक यांना अटक करून जोधपूर तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. या हिंसाचारात 17 सीआरपीएफ जवान आणि 70 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सोनम वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

लडाखला संवैधानिक हक्क आणि पर्यावरणाचे संरक्षण मिळावे यासाठी वांगचुक यांनी आमरण उपोषण केले. लेहमध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांनी हिंसक कृत्य केल्याचा आरोप केला जात आहे. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेच्या प्रकरणात सामाजिक आणि शैक्षणिक नेते कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना अटक झाली.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...