“उद्धव ठाकरेंकडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही…”

मुंबई – उद्धव ठाकरेंकडे एक मोठा गुण आहे जो इतर कोणत्याही ठाकरेंकडे नाही असं म्हणत मनसेच्यावतीने निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाबाबत दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. काल उशिरा रात्री निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय दिला. ज्यानुसार मुंबईतील आगामी पोटनिवडणुकीमध्ये धनुष्यबाण या चिन्हासह शिवसेना हे नाव कोणत्याही गटाला वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानांतर राजकीय प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झाली आहे.
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आणि राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे दिसून आले. यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये देशपांडे म्हणतात, “उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल” असा टोला यावेळी देशपांडेंनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 9, 2022
दोन्हीही गटाला उद्या म्हणजेच सोमवारी चिन्हासाठीचे ३ पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर करायचे आहेत. म्हणूनच आज उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळच्या सहकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दोन्हीही गट यानंतर आपली प[पुढील रणनीती ठरवणार आहे.





