Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडल्याने चेन्नई दौरा रद्द
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चेन्नई दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी चेन्नई दौरा रद्द केल्याचे वृत्त आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चेन्नई दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी चेन्नई दौरा रद्द केल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Uddhav Thackeray)
डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकाबाबत विरोधकांची पुढील रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या आज चेन्नई आणि मुंबई येथे महत्त्वाच्या बैठका नियोजित आहेत. (Uddhav Thackeray)
चेन्नईनंतर मुंबईत शरद पवारांची भेट
इंडिया आघाडीतील प्रमुख नेते प्रथम चेन्नई येथे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर हे नेते मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. (Uddhav Thackeray)
या बैठकांमध्ये डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्याबाबत आणि पुढील राजकीय रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेते या दौऱ्यात सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे मुंबईतील बैठकीला जाणार?
मुंबईतील शरद पवार यांच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता होती. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी चेन्नई दौरा रद्द केल्याचे वृत्त समोर आल्याने मुंबईतील बैठकीतील त्यांच्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे मुंबईतील बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबतही अधिकृत वैद्यकीय माहिती उपलब्ध झालेली नाही. (Uddhav Thackeray)
डिलिमिटेशन विधेयकावरून विरोधकांमध्ये मतभेद असताना इंडिया आघाडीची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार का आणि विरोधकांची पुढील भूमिका काय ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Uddhav Thackeray)




