Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर; काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेणार
Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौरा करणार असून, या दौऱ्यात ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे,

Uddhav Thackeray : ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौरा करणार आहेत. त्यावेळी ते कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती ठाकरेसेनेतील सुत्रांनी दिली. (Uddhav Thackeray)
आपचे खासदार संजय सिंह यांनी त्यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त विशेष समारंभाचे आयोजन केले आहे. तो समारंभ ६ डिसेंबरला दिल्लीत होईल. सिंह यांच्या निमंत्रणावरून उद्धव त्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. (Uddhav Thackeray0
त्या निमित्ताने उद्धव यांचा दोन ते तीन दिवस दिल्लीत मुक्काम असेल. त्यावेळी ते राहुल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अर्थात, त्या संभाव्य भेटीची औपचारिक पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही. उद्धव आणि राहुल यांची भेट झाल्यास ती महत्वपूर्ण घडामोड ठरेल. (Uddhav Thackeray)
त्यातून ठाकरेसेना आणि कॉंग्रेसमधील मैत्री मजबूत होण्यास हातभार लागू शकतो. दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीचे घटक आहेत. (Uddhav Thackeray)
इंडिया आघाडीत समावेश असणाऱ्या विरोधी पक्षांमधील एकजूट वाढत असल्याचे मागील काही काळापासून दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव आणि राहुल यांच्यातील संभाव्य भेटीला विरोधकांमधील ऐक्याच्या दृष्टीने महत्व प्राप्त होईल. (Uddhav Thackeray)




