Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ महिला नेत्याने सोडली साथ

मुंबई : ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेईना. आज तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता तेजस्वी घोसाळकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली. यामध्ये आता तेजस्वी घोसाळकर यांची भर पडली आहे.
तेजस्वी घोसाळकर यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला उत्तर मुंबईत मोठा धक्का बसला आहे. स्थानिक विभागप्रमुख आणि विभाग संघटकांवर नाराजी व्यक्त करत तेजस्विनी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याचं समजत आहे. यापूर्वीही तेजस्विनी यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती, परंतु पक्षाकडून दखल न घेतल्याने त्यांनी हा राजीनामा दिला आहे. आता त्या राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तसेच ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई आहेत. त्या ठाकरे पक्षाच्या दहिसर विधानसभेच्या महिला प्रमुख होत्या.उद्धव ठाकरे कुटुंबाशी घोसाळकर कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. मागच्या वर्षी अभिषेक घोसळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.



