Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता करणार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
राज्यात एकीकडे 'ऑपरेशन टायगर'वरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, दुसरीकडे रायगड जिल्ह्याच्या राजकारणातून (Uddhav Thackeray) एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे.

Uddhav Thackeray : राज्यात एकीकडे ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, दुसरीकडे रायगड जिल्ह्याच्या राजकारणातून (Uddhav Thackeray) एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खंदे आणि महत्त्वाचे नेते तसेच श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्ष (Uddhav Thackeray) अतुल चोगले हे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिवसेनेत’ (शिंदे गट) अधिकृत प्रवेश करणार आहेत.
हा हाय-व्होल्टेज पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे पार पडणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चोगले यांचा हा निर्णय ठाकरे गटासाठी (Uddhav Thackeray) रायगड जिल्ह्यात खूप मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
आदिती तटकरेंच्या बालेकिल्ल्यात मिळवला होता ऐतिहासिक विजय
श्रीवर्धन नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत अतुल चोगले यांनी मिळवलेला विजय ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. हा मतदारसंघ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांच्या प्रभावाखालील बालेकिल्ला मानला जातो.
अशा कठीण मतदारसंघात चोगले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे जितेंद्र सातनाक यांचा थेट पराभव केला होता आणि नगराध्यक्षपदाला गवसणी घातली होती. या धक्कादायक विजयामुळे चोगले यांच्या नेतृत्वाची संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा झाली होती.
भरत गोगावलेंच्या ‘त्या’ भेटीची झाली होती चर्चा
नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर महायुतीचे नेते आणि शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद, आमदार भरत गोगावले यांनी विशेष तौरवर अतुल चोगले यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. तेव्हापासूनच चोगले हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. आता थेट ‘नंदनवन’वर होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे त्या सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
स्थानिक राजकारणावर काय होणार परिणाम?
शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतरही अतुल चोगले यांनी रायगडमध्ये ठाकरे गटाची बाजू खंबीरपणे लावून धरली होती. मात्र, आता त्यांच्याच पक्षांतरामुळे श्रीवर्धन आणि आसपासच्या भागातील स्थानिक राजकीय समीकरणे (Uddhav Thackeray) पूर्णपणे बदलणार आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार असून, ठाकरे गटाला रायगडमध्ये नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.






