Uday Kotak: अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेला हल्ला हे सर्वसाधारण युद्ध नाही तर वसाहतवादाच्या पुन्हा प्रवेशाची अपशकुनी घटना ठरू शकते, अशी शंका ज्येष्ठ बँकर उदय कोटक यांनी व्यक्त केली आहे. मात्र हे आपले राजकीय वक्तव्य नाही तर इतिहासाच्या आधारावर केलेले निरीक्षण आहे असे ते म्हणाले. फिक्की या उद्योजकाच्या संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना कोटक यांनी सध्याच्या युद्ध परिस्थितीचे आणि त्या अनुषंगाने विविध घटना क्रमाचे विश्लेषण केले. ते म्हणाले की, आता जागतिक पातळीवर ज्या घटना घडत आहेत, अशाच प्रकारच्या घटना विसाव्या शतकापूर्वी आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात घडल्या होत्या. त्यानंतर काही देशांनी इतर देशावर राज्य केले आणि वसाहतवाद निर्माण केला. सध्या ज्या घटना घडत आहेत त्यावरून जागतिक वसाहतवाद पुन्हा जागतिक व्यासपीठावर अवतरतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे. हेही वाचा – IDBI Bank: आयडीबीआय बॅंकेच्या भागभांडवल विक्रीला ब्रेक; कमी बोलींमुळे प्रक्रिया थांबली, नव्या बोलींची शक्यता जागतिक वसाहतवादाचा बळी भारतही ठरला होता आणि त्या विरोधात इतर आंदोलनाबरोबरच फिक्कीच्या सदस्य उद्योगांनी 1927 ते 1947 दरम्यान लढा दिला होता. आता पुन्हा 2026 मध्ये असाच प्रकार घडत असल्याचे दिसून येते असे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ह ट्रम्प एक वर्षापासून आणि आता युद्ध सुरू झाल्यापासून ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत त्यावरून जगात पुन्हा वसाहतवाद येण्याची भीती निर्माण झाली आहे. पुन्हा वसाहतवदाप्रमाणेच जगातील काही बळकट देश इतर देशांच्या संपत्तीची लुबाडणूक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, या विषयावर सध्या जागतिक पातळीवर चर्चा चालू आहे. बर्याच घटना घडत आहेत. त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न माझ्याप्रमाणे अनेक जण करत आहेत. त्यामध्ये राजकीय दृष्टिकोन नाही. भारतीय उद्योग क्षेत्राबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, 100 ते 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मध्यम स्वरूपाच्या मॅन्यफॅक्चरिंग क्षेत्रावर जर भारताने भर दिला, तर आगामी काळात आपण आत्मनिर्भार होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर बड्या कंपन्यांनी जुनी उत्पादने विकण्याबरोबरच नवी उत्पादने विकसित करण्यासाठी संशोधन आणि विकासावर भर देण्याची गरज आहे. तरच आपण जागतिक व्यासपीठावर नवी उत्पादने उपलब्ध करू शकतो.