IDBI Bank: सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेच्या भागभांडवल विक्रीसाठी केंद्र सरकारने बोली मागविल्या होत्या. मात्र दोन इच्छुकांनी बोललेल्या बोली राखीव किमतीपेक्षा कमी होत्या. त्यामुळे ही प्रक्रिया गुंडाळण्यात आली. आता याच दोन बोलीदारांकडून सुधारित बोली केंद्र सरकार मागविण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. बरीच प्रक्रिया करून आयडीबीआय बँकेची भांडवल विक्री करण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. मात्र ऐनवेळी सरकारच्या राखीव किमतीपेक्षा जास्त बोली कोणाकडूनही आल्या नाहीत. त्यामुळे ही प्रक्रिया सरकारने थांबविले होती. आता अखाती युद्धामुळे सरकारच्या महसुलावर दबाव आला आहे. हेही वाचा – Cosmos Bank: कॉसमॉस बँकेची दमदार कामगिरी; व्यवसाय 44 हजार कोटींवर, शाखा विस्ताराला वेग खासगी क्षेत्र गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे भाग भांडवल विकून निधी उभा करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयडीबीआय बँकेच्या जुन्या बोलीदाराकडे नव्याने बोली मागविल्या जाण्याची शक्यता असल्याचे यासंदर्भातील सूत्रांनी वृत्तसंस्थांना सांगितले. तीन वर्षाच्या तांत्रिक प्रक्रियानंतर आयडीबीआय बँकेची बोली प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र ऐनवेळी ही प्रक्रिया अयशस्वी झाली. आता पुन्हा सरकार तीन वर्षाची प्रक्रिया करण्याच्या विचारात नाही. त्याऐवजी फक्त बोली नव्याने मागविल्या जाण्याची शक्यता आहे. या बँकेत सरकार आणि एलआयसीचे 60.72% भाग भांडवल सरकार विकू इच्छित आहे. 6 फेब्रुवारी रोजी शेवटच्या बोली आल्या. मात्र त्या राखीव किमतीपेक्षा कमी होत्या.