मोदींना ‘यूएई’चा सर्वोच्च नागरी सन्मान

अबुधाबी: पंतप्रधान नरेंद्र मोदी याना’यूएई’चा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ जायद’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. मोदी हे आपला दोन दिवसीय फ्रांसचा दौरा झाल्यानंतर अबूधाबीमध्ये पोहचले आहेत. या ठिकाणी त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

मोदींनी हा पुरस्कार स्वीकारण्याआधी ‘यूएई’चे शासक यांच्यासोबत उच्चस्तरीय चर्चा केली. तसेच अबूधाबीमध्ये यूएईचे राजे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची देखील भेट घेतली. बहरींमध्ये मोदींच्या हस्ते एका प्राचीन मंदिराचे उदघाटन होणार असून त्यांनतर तेथिल भारतीय समुदायाला ते संबोधित करणार आहेत.

यावेळी भारत आणि यूएईचे संबंध अधिक दृढ होत आहेत. दुबईला खास शहर बनवण्यासाठी लाखो भारतीयांनी योगदान दिले आहे. तसेच ते आज या ठिकाणी सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत, असे मोदी म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×