UAE vs OMA : यूएईचा धमाकेदार विजय, ओमानला ४२ धावांनी लोळवलं!

यूएईच्या फलंदाजांनी ओमानच्या गोलंदाजांना फोडला घाम –
ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी घातक ठरला. यूएईच्या सलामीवीर अलीशान शराफू आणि कर्णधार मुहम्मद वसीम यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 11 षटकांत 88 धावांची भागीदारी केली. अलीशानने 38 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारासह 51 धावांची विस्फोटक खेळी केली.
The UAE triumphed over Oman thanks to Junaid Siddique’s pace attack and Muhammad Waseem’s sparkling first-innings performance.
#UAEvsOMA #SportsInfoCricket pic.twitter.com/wcItWR0vrh— SportsInfo Cricket (@SportsInfo11983) September 15, 2025
त्याचबरोबर मुहम्मद वसीमने 54 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांसह 69 धावांची कर्णधारी खेळी साकारली. मुहम्मद जोहैबने 21, तर हर्षित कौशिकने अवघ्या 8 चेंडूंमध्ये नाबाद 19 धावा जोडल्या. त्यामुळे यूएईने 20 षटकांत 5 गडी गमावून 172 धावांचा डोंगर उभा केला. ओमानकडून जितेन रामानंदीने 2, तर हसनैन शाह आणि समय श्रीवास्तव यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.
हेही वाचा – UAE vs OMA : यूएईच्या मुहम्मद वसीमचा टी-20 मध्ये जागतिक विक्रम, इंग्लंडच्या बटलरलाही टाकले मागे!
ओमानची निराशाजनक फलंदाजी –
यूएईने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. अवघ्या 7 धावांवर त्यांची पहिला धक्का बसला, तर 50 धावांपर्यंत अर्धा संघ तंबूत परतला. विशेष म्हणजे, एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा गाठता आला नाही. आर्यन बिष्टने सर्वाधिक 24, तर कर्णधार जतिंदर सिंग आणि विनायक शुक्ला यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या.
हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानी चाहत्यांचे घृणास्पद कृत्य, सामन्यादरम्यान सूर्याच्या पत्नीबद्दल गुगलवर करत होते सर्च
परिणामी, ओमानचा डाव 18.4 षटकांत 130 धावांवर आटोपला. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने 4 षटकांत केवळ 23 धावांत 4 विकेट्स घेत गोलंदाजीत कमाल केली.यूएईच्या या विजयाने त्यांच्या सुपर-4 मधील आशा जिवंत ठेवल्या, तर ओमानला मोठा धक्का बसला. हा सामना यूएईच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील समतोल कामगिरीचे उदाहरण ठरला.





