UAE News : युएईमध्ये सोशल मीडियावरून युद्धाबाबत दिशाभूल करणाऱ्यांवर मोठी कारवाई; 35 जणांना अटक
सध्या सुरू असलेल्या इराण विरुद्धच्या युद्धासंदर्भात (UAE News) सोशल मीडियावरून दिशाभूल करणारे फोटो, व्हिडीओ किंवा अन्य संदेश पसरवणाऱ्यांवर यूएइमध्ये मोठी कारवाई केली जाते आहे.

UAE News : सध्या सुरू असलेल्या इराण विरुद्धच्या युद्धासंदर्भात (UAE News) सोशल मीडियावरून दिशाभूल करणारे फोटो, व्हिडीओ किंवा अन्य संदेश पसरवणाऱ्यांवर यूएइमध्ये मोठी कारवाई केली जाते आहे. एकूण ३५ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये १९ भारतीयांचाही समावेश आहे.
सर्व आरोपींवरील कायदेखील खटला जलदगतीने न्यायालयाकडे सोपवण्यात आला असल्याचे यूएइमधील वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सोशल मीडियावरून (UAE News) दिशाभूलीचे संदेश पसरवणाऱ्या या २५ जण वेगवेगळ्या देशांचे नागरिक आहेत. त्यात १७ भारतीय आहेत. एका अन्य प्रकरणात १० जण आढळले आहेत. त्यातही २ भारतीय आहेत. त्यांची ओळख पटली असून त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक अराजकता भडकवण्यासाठी आणि सामान्य स्थिरता बिघडवण्याच्या उद्देशाने बनावट माहिती आणि कृत्रिम सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर कठोर देखरेख ठेवण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे, असे अॅटर्नी-जनरल डॉ. हमद सैफ अल शम्स यांनी म्हटले आहे.
यूएइच्या हवाई हद्दीत क्षेपणास्त्रे घुसली, पाडण्यात आली असा दावा काही व्हिडीओंद्वारे काही जणांनी केला होता. काही एकत्रीकरणांचे व्हिडीओ करून जनतेमध्ये आंदोलन झाल्याचा दावा देखील या लोकांनी केला होता. सुरक्षा यंत्रणा निकामी झाल्याचा आभास यामुळे निर्माण झाला आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या.
या गटात पाच भारतीय, एक पाकिस्तानी, एक नेपाळी, दोन फिलिपिनो आणि एक इजिप्शियन होता. दुसऱ्या गटाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे स्फोट, क्षेपणास्त्र आणि राष्ट्रध्वजाचा वापर करून चुकीची माहिती पसरवली होती. यामुळे लोकांची दिशाभूल झाली होती. सात जणांचा समावेश असलेल्या या गटात पाच भारतीय आणि नेपाळ आणि बांगलादेशातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
तिसऱ्या गटाने एका शत्रू देशाचे, त्याच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचे गौरव करणारी सामग्री प्रकाशित केली. यामध्ये सहा आरोपींपैकी पाच भारतीय आहेत, तर एक पाकिस्तानी आहेत.






