U19 Asia Cup 2024, Semifinal 2 (PAK vs BAN) : पुरुष अंडर-19 आशिया कप 2024 युएई मध्ये खेळवला जात आहे. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश संघांमध्ये दुबईत पार पडला. या उपांत्य फेरीच्या सामन्यात अझीझुल हकीमच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. यासह बांगलादेशने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 37 षटकात 116 धावांवरच गारद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने 22.1 षटकात 3 विकेट गमावत 120 धावा केल्या आणि पाकिस्तानवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला.
ACC MEN’S U19 ASIA CUP 2024 | Semi-Final
Bangladesh U19 🆚Pakistan U19Bangladesh Won by 7 Wickets 💥👏
PC: CREIMAS Photography#BCB #Cricket #ACC #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/v8Onvgq9O0
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 6, 2024
पाकिस्तानकडून फरहान युसूफने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर महंमद रियाझुल्लाहने 28 धावांचे योगदान दिले. या दोन फलंदाजांशिवाय कोणताही खेळाडू जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. संघाच्या दोन्ही सलामीवीरांना खातेही उघडता आले नाही. या डावात पाकिस्तानचे एकूण 4 फलंदाज शुन्यावर बाद झाले. दुसरीकडे, इक्बाल हुसेन इमॉन हा बांगलादेशचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. इक्बाल हुसैन इमॉनने 7 षटकात केवळ 24 धावा दिल्या आणि 4 फलंदाजांना आपले बळी बनवले. त्याचवेळी मारूफ मृधालाही 2 यश मिळाले. अल फहाद आणि देबाशिष देबा यांनीही प्रत्येकी 1 बळी घेण्यात यश मिळवले.
या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनंतर गोलंदाजही फ्लॉप ठरले. त्याचवेळी त्यांना फारशी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे बांगलादेशने 3 गडी गमावून 117 धावांचे लक्ष्य सहजरित्या गाठले. बांगलादेशचा कर्णधार अझीझुल हकीमने या सामन्यात कर्णधारपदाची खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. कर्णधार अझीझुल हकीमने 42 चेंडूत 7 चौकार अन् 3 षटकारासह सर्वाधिक 61 धावा केल्या.
U19 Asia Cup 2024 : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, सेमी फायनलमध्ये श्रीलंकेचा उडवला धुव्वा…
अंतिम फेरीत भारत-बांगलादेश….
या पराभवासह पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. बांगलादेशनं अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आता भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ 8 डिसेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमने-सामने येतील. अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.