U17 World Championships 2024 : भारतीय कुस्तीपटू रोनक दहियाची उपांत्य फेरीत धडक…

U17 World Championships 2024 – भारताचा कुस्तीपटू रोनक दहियाने शानदार कामगिरी करताना १७ वर्षांखालील गटाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ११० किलो वजनी गटात खेळताना आर्टूर मॅनवेलियन व डॅनिल मास्लाकौ यांच्यावर मात करताना उपांत्य फेरी गाठली. रोनक वगळता इतर कुस्तीपटूंनी मात्र निराशा केली.
RONAK ENTERS SEMIFINAL IN GR110 🚨
Wrestling U17 World Champs
Detailed Results
GR48 Qual
Bikash 🇮🇳 lost to (1-11) Kristov
✨No RepechageGR55 R16
Samarth 🇮🇳 lost to (0-8) Yurik 🇦🇲
▶️ Repechage*GR65 R16
🇮🇳Anuj lost to (1-10) Pokotylo 🇺🇦
▶️ Repechage*GR80 R16
Nishant 🇮🇳… pic.twitter.com/ceZzgtYzPr— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) August 19, 2024
सोमवारी झालेल्या स्पर्धेत रोनकने पहिल्या फेरीत आर्टूर मॅनवेलियनवर ८-१ असा विजय साकारला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याने डॅनिल मास्लाकौवर तांत्रिक गुणांच्या साहाय्याने विजय मिलविताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत रोनक समोर हंगेरीच्या झोल्टन झॅकोचे आव्हान राहणार आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सराव करणाऱ्या रोनकने प्रथमच स्पर्धेत सहभागी होताना उपांत्य फेरी पर्यंत मजल मारली आहे.
रोनक व्यतिरिक्त निशांत फोगटने ८० किलो गटात विजय साकारला. निशांतने पात्रता फेरीत अल्जेरियाच्या मोहम्मद अबादीविरुद्ध ७-१ असा विजय मिळविताना मुख्य स्पर्धेत प्रवेश केला होता. मात्र त्याला मोल्दोव्हाच्या निचिता अपोस्टोलकडून निकषांवर पराभव पत्करावा लागला.


