U17 World Wrestling C’Ship 2024 : भारतीय कुस्तीपटू रोनक दहियानं पटकावले कांस्यपदक…

U17 World Wrestling Championships 2024(Jordan): – भारताचा कुस्तीपटू रोनक दहियाने जागतिक कुस्ती स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या 110 किलो गटात कांस्य पदकाची कमाई केली. 17 वर्षांखालील गटाच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रोनकने तुर्कीच्या इमरुल्ला कॅपकनचे आव्हान 6-1 असे मोडून काढताना कांस्यपदक पटकावले.
उपांत्य फेरीत रोनकला हंगेरीच्या झोल्टन झाकोकडून पराभव स्वीकारावा लागला होता. स्पर्धेच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या इव्हान यांकोव्स्कीने झोल्टन झाकोला पराभूत करताना सुवर्ण कामगिरी बजावली होती.
Update: U-17 World #Wrestling Championship, Jordan🇯🇴
🇮🇳 India’s talented wrestler Ronak Dahiya defeated Turkey’s🇹🇷 Emrullah Capkan 6-1 to secure bronze🥉 in Men’s GR 110 kg event.
Well done, Ronak👏🏻 pic.twitter.com/WecKeZVxbK
— SAI Media (@Media_SAI) August 21, 2024
स्पर्धेत भारताला साईनाथ पारधी यांच्याकडून दुसऱ्या पदकाची अपेक्षा आहे. 51 किलो वजनी गटातून दोन लढती जिंकल्यास तो रौप्य पदकाचा मानकरी होऊ शकतो.
साईनाथची पहिली लढत अमेरिकेच्या डॉमिनिक मायकेल मुनारेटोशी असून या लढतीत त्याने विजय मिळविल्यास पदकासाठी त्याला आर्मेनियाच्या सर्गिस हारुत्युनान आणि जॉर्जियाच्या इउरी चॅपिडझे यांच्यातील विजेत्यांशी लढावे लागणार आहे.





