Mumbai News : मुंबईत दोन तरुणांचा खाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू
दहिसर (पूर्व) येथील केतकी पाडा परिसरातील शेख खदान येथे शनिवारी सकाळी पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी सुमारे १०.२६ वाजता घडली.

Mumbai News – दहिसर (पूर्व) येथील केतकी पाडा परिसरातील शेख खदान येथे शनिवारी सकाळी पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी सुमारे १०.२६ वाजता घडली.
माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना पाण्याबाहेर काढून तातडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
पियुष गुप्ता (वय १९) आणि ओम अंकुश सिंग अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही सुमारे १० ते १५ फूट खोल पाण्यात बुडाल्याची माहिती आहे. ही खाण राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील शेख खदान परिसरात आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य सुरू केले. स्थानिक पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून दोघे खाणीत कसे बुडाले याचा शोध घेतला जात आहे.





