पुणे | दोन अपघातांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात महापालिका भवनाजवळ, तर दुसरी घटना बाणेर परिसरात घडली.
महापालिकेजवळ दुचाकी घसरून मागे बसलेल्या वरद शैलेंद्र नाईक (२३, रा. येवलेवाडी) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यश पांचपोळ (रा. शनिवार पेठ) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवली. यामुळे मागे बसलेले वरद हे रस्त्यावर पडून जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
तर, बाणेर येथे डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत अभिषेक मनोज सरनाईक (३४, रा. ननावरे ब्रिजजवळ सुसगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांत अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ४ जुलै रोजी घडली. अभिषेक हे दुचाकीवरून घरी निघाले होते. योगी पार्क ननवरे चौक येथे डंपरने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात सरनाईक गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.





