जम्मू- जम्मू काश्मीर येथील लष्कराच्या उपहारगृहात काम करणाऱ्या दोन कामगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी संपर्क क्रमांक आढळल्यानंतर चौकशी करिता त्यांना ताब्यात घेतले असल्याचीमाहिती लष्कराच्या सुत्रांनी दिली आहे.
मोहन लाल (43) आणि अमित दिक्षित (20) असे या कामगारांचे नाव असून शुक्रवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणी लष्कराने या दोघांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.