Dadar railway station : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी जळाल्या
Updated On:

Dadar railway station – दादर रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक 14 बाहेरील पार्किंग स्टँडमध्ये अचानक भीषण आग लागुन पंधराहून अधिक वाहने आगीच्या कचाट्यात आली आणि जळून खाक झाली आहेत. एका दुचाकीला लागलेली आग भडकत गेल्याने ही दुर्घटना घडली आहे.
सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी वेळीच अग्निशमन उपकरण वापरल्याने आग नियंत्रणात आली. घटना घडताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली, पण दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग नेमकी कशी लागली, याचा तपास सुरु केला आहे.





