पुणे | दुचाकी चोराला अटक, बारा वाहने जप्त
Updated On:

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – कोथरुड पोलिसांनी एका वाहनचोराला अटक केली. त्याच्याकडून कोथरुड, पौड आणि डेक्कन हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत सहा लाख रुपये किंमतीच्या बारा दुचाकी जप्त केल्या आहेत.
नीलेश रमेश कंधारे (३३, रा.जय मल्हार हौसिंग सोसायटी, कोथरुड) असे चोरट्याचे नाव आहे. त्याला दुचाकी चोरीचा छंद असून, त्यातूनच त्याने गाड्यांची चोरी केली. चोरीची गाडी फिरवून झाल्यानंतर पेट्रोल संपले, की तो तेथेच गाडी सोडून देत असे. वाहनचोरीला प्रतिंबंध घालण्यासाठी कोथरुड पोलिसांचे पथक गस्तीवर होते.
त्यावेळी नीलेशबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप, कर्मचारी अजिनाथ चौधर, विशाल चौगुले, संजय दहिभाते, आकाश वाल्मिकी, विष्णू राठोड यांच्या पथकाने केली




