शिरूर तालुक्यात दुचाकी चोरीचा धडाका सुरूच; पुन्हा दोन दुचाकी चोरी

शिरूर : शिरूर तालुक्यात दुचाकी चोरीचा धडाका सुरूच आहे. तालुक्यातील तीन दुचाकी चोरीनंतर पुन्हा एकदा दोन दुचाकी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसात तिन दुचाकी चोरीच्या घटनांनी शिरूर पोलिस यंत्रणेला धक्का दिला असतानाच, आणखी दोन नवीन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पहिली घटना मांडवगण फराटा येथे ११ एप्रिल रोजी घडली आहे. फिर्यादी हणुमंत गोविंद होले (वय ६७) हे बाजारात गेले असताना त्यांनी आपली स्प्लेंडर प्लस (MH-12-QV-3266) ही दुचाकी बाजार मैदानासमोर पार्क केली होती. बाजार करून परत आल्यानंतर त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी घटना १२ एप्रिल रोजी नागरगाव येथील हॉटेल गणेशसमोर घडली आहे. फिर्यादी अमोल श्रीराम नवघरे (वय ३०) हे मुलांना नाश्ता देण्यासाठी गेले असता, त्यांची एचएफ डिलक्स (MH-38-AG-2802) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन्ही घटनांचा शिरूर पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये या भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस विभागाने या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





