Two Wheeler Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे ठार
Updated On:

कन्नड – दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्ग आंधानेर फाट बायपासवर शुक्रवारी दुपारी घडली. संजय सखाराम माळवे (वय 26, रा. सातकुंड, ता. कन्नड), सागर पांडुरंग काळे (वय 30, रा. लोहगाव, ता. पैठण हल्ली मुक्काम जयभवानीनगर औरंगाबाद) यांचा अपघातात मृत्यू झाला.
संजय आपल्या दुचाकी वरुन कन्नडहून सातकुंडकडे जात होता. तर सागर आपल्या दुचाकीवरुन औरंगाबादॉकडे येत होते. यावेळी आंधानेर येथील राष्ट्रीय महामार्ग बायपासवर दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात हे दोघेही ठार झाले आहे. सागर काळे यांचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.
सागर हा एका कन्स्ट्रक्शन कंपनीत सुपरवायजर म्हणून नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई पत्नी आणि एक छोटी बहीण असा परिवार आहे.





