Strait of Hormuz : होर्मुझमध्ये यूएईच्या दोन टँकरवर हल्ला; इराणची कृती सागरी चाच्यांप्रमाणे-युएईचा आरोप
हा हल्ला सागरी चाच्यांप्रमाणे केल्याचा आरोप यूएईने केला आहे. या ड्रोन हल्ल्यांमुळे टँकरवर कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Strait of Hormuz – होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून प्रवास करत असलेल्या आपल्या सरकारी तेल तंपनीच्या दोन टँकरवर इराणने ड्रोन हल्ला केल्याचा दावा संयुक्त अरब अमिरातीने केला आहे. हा हल्ला सागरी चाच्यांप्रमाणे केल्याचा आरोप यूएईने केला आहे. या ड्रोन हल्ल्यांमुळे टँकरवर कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण यामुळे हा सागरी मार्ग मालवाहू जहाजांसाठी अजूनही धोकादायक असल्याचेच अधोरेखित झाले आहे.
गुरुवारी संध्याकाळी हल्ला झालेले दोन्ही टँकर यूएईच्या एडीएनओसी या सरकारी कंपनीच्या मालकीचे आहेत. या ड्रोन हल्ल्यांमुळे जहाजांचे नुकसान झाले असले, तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा हल्ला इराणनेच केला असून या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्रच्या सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्याच्या तत्वाचे उल्लंघन झाल्याचे यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
आर्थिक सक्ती लादण्यासाठी किंवा ब्लॅकमेलिंग करणे हे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे चाचेगिरीसारखे कृत्य आहे. त्यासाठी व्यवसायिक जहाजांना लक्ष्य करून करण्याचा शस्त्रासारखा वापर केला जातो आहे. यामुळे प्रादेशिक स्थिरता, लोक आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेला थेट धोका निर्माण केला जात असल्याचेही यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
जरेड कुशनर करणार मध्यपूर्वेचा दौरा
गाझामधील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जरेड कुशनर पुढील आठवड्यात मध्यपूर्वेचा दौरा करणार आहेत. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या कराराचा पाठपुरावा या भेटीदरम्यान केला जाणार आहे. पण इस्रायलने या कराराला विरोध केला आहे.
इस्रायल-हमासमधील युद्धबंदीवर देखरेख करण्यासाठी ट्रम्प यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बोर्ड ऑफ पीसमध्ये कुशनर यांच्यासह निकोलाय म्लादेनोव्ह आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचाही समावेश आहे. हे देखील रविवारी इस्रायलमध्ये दाखल होत आहेत.
हे सर्व जण नंतर पॅलेस्टिनी तंत्रसासकीय गटाबरोबरच्या बैठकीसाठी कैरोला जाणार आहेत. तेथे युद्धबंदी करारा अंतर्गत गाझाचे नियंत्रण घेण्याबाबत बैठक होणार आहे. गाझाचे नियंत्रण घेण्याबाबतची पूर्वतयारी गेल्या सात महिन्यांपासून सुरू आहे.





