Nagar | पुणतांबा रेल्वे स्थानकावर दोन गाड्यांना थांबा

पुणतांबा, (वार्ताहर) – 15 ऑगस्ट रोजी जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा, यासाठी सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. सुमारे तीन तास रेल रोको आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले होते.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणतांबेकरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पुणे-अमरावती व कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळेल, असे लेखी आश्वासन दिले होते.
दोन दिवसांपूर्वी रेल्वे दिल्ली बोर्ड यांनी पुणे-अमरावती व कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात येईल, असे लेखी पत्र दिले होते.
त्यामुळे पुणतांबेकरांनी केलेल्या आंदोलनाला यश आले. उर्वरित जलद गाड्या देखील लवकरात थांबा मिळेल, असे आश्वासन शिर्डी येथे नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
पुणतांबा येथे १५ आॅगस्टला सर्वपक्षीय रेल रोको आंदोलनात दिलेल्या आश्वासनानंतरही दीड महिन्याचा कालावधी होऊन गेला तरी जलद गाड्यांना थांबा मिळाला नव्हता. आंदोलनकर्त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला.
2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून पुणतांबेकरांच्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक असून रेल्वे बोर्डाकडे आपल्या मागण्या पाठवले आहे.
रेल्वे फाटकाबाहेरील रस्त्याबाबत तसेच भुयारी मार्गाबाबत ज्या अडचणी आहे, त्या सोडवण्यासाठी आंदोलन करताना नगर येथे बोलण्यात आले होते.
इंजिनिअरिंग विभाग व आंदोलनकर्ते यांची चर्चा होऊन सकारात्मक बाब समोर आल्यामुळे दोन ऑक्टोबरचे उपोषणाचे आंदोलन स्थगित केले होते
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी येथील कार्यक्रमात आंदोलनकर्त्यांनी रेल्वेच्या मागण्याबाबत निवेदन दिले होते.
याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते.
दोन दिवसांपूर्वी रेल्वे दिल्ली बोर्ड यांनी पुणे अमरावती व महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात येईल, असे लेखी पत्र दिले होते.
त्यामुळे पुणतांबेकरांनी केलेल्या आंदोलनाला यश आले. उर्वरित जलद गाड्या देखील लवकरात थांबा मिळेल, असे आश्वासन शिर्डी येथे नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
पुणतांबा जंक्शन असून देखील जलद गाड्यांना थांबा मिळालेला नव्हत. नुसते जंक्शन नावाला उरले होत, मात्र पुणतांबेकरांच्या एकजुटीमुळे ऐतिहासिक रेल्वे ग्रुप आंदोलन झाल्यामुळे रेल्वे बोर्डाला दखल घ्यावी लागली.
गेल्या दोन ते तीन दिवसांत या दोन गाड्यांना अधिकृत थांबा मिळेल तसेच रेल्वे तिकीट विक्री देखील सुरू होणार आहे. या दोन गाड्या सुरू झाल्यामुळे पुण्याला व मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
उर्वरित शिर्डी-दादर, झेलम एक्सप्रेस, पुणे-नागपूर, काकीनाडा यांना येणाऱ्या काळात नक्की थांबा मिळेल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रेल्वेगाड्याला थांबा मिळाल्यामुळे गावाने दाखवलेली एकजूट यातून दिसून आली.





