अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
Updated On:

श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरामध्ये सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये बातमी हाती येईपर्यंत चकमक सुरूच आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीर पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, गुंड बाबा संगममध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. शोधमोहीम चालू असताना दहशत्वाद्यानी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रतिउत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले.





