मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात आणखी दोन आत्महत्या

बीड/हिंगोली – बीड जि.प.आवारात मराठाआरक्षणाच्या मागणीसाठी अर्जून कवठेकर (४३, रा.बीड) या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. तर हिंगोलीतील कळमनुरीतालुक्यातील पिंपरी बुद्रूक येथीलगोविंद खराटे या तरुणाने याचमागणीसाठी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. दरम्यान, यापूर्वीदेखील मराठा आरक्षणासाठी काही जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
रविवारी सकाळी बीड जिल्हापरिषदेच्या आवारातील लिंबाच्याझाडाला गळफास घेत अर्जुन अंबादास कवठेकर (४३, रा.नायगाव, ता. पाटोदा, ह.मु.,अंकुशनगर, बीड) यांनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. आत्महत्येस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर पिंपरी बुद्रूक येथील गोविंद खराटे (३०) यांचे अडीच एकर शेत आहे. या शेतात त्यांनी विष घेतले.





