Sharad Pawar : दोन शिलेदारांनी करेक्ट कार्यक्रम केला; शरद पवारांनी पडद्यामागून सूत्रे फिरवली; महाविकास आघाडीचे जोरदार कमबॅक
Sharad Pawar : नुकताच राज्यातील पाच ठिकाणच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा निकाल जाहीर झाला.

Sharad Pawar : २०१९ ची लोकसभा…शरद पवारांचं भर पावसात सुरू असलेलं भाषण…त्या एका भाषणाने संपूर्ण मतदान फिरलं. आजही या भाषणाची चर्चा होते. वयाच्या ८५ व्या वर्षात असतानाही शरद पवार थांबतं नाहीत. सातत्याने भूमिका मांडतात. सरकारने घेतलेल्या निर्णयावर व्यक्त होऊन रोखठोक मुद्दे मांडतात.
नुकताच राज्यातील पाच ठिकाणच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा निकाल जाहीर झाला. या निकालाने महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीला २ ठिकाणी यश मिळाले असून ३ जागांवर महाविकास आघाडीतील उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. यातील नागपूर पदवीधरच्या जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली.
शरद पवारांची पडद्यामागून खेळी
या निकालावर सर्वच स्तरातून विश्लेषण केले जात आहे. महायुतीकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. या निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीने जोरदार कमबॅक केले आहे. खरंतर प्रत्येकवेळी निवडणुकीत सक्रीय असेलेले ज्येष्ठ नेते शरद पवार या निवडणुकीत फारसे कुठे दिसले नसले तरी पडद्यामागून त्यांनी सूत्र हलवल्याची चर्चा होत आहे.
दोन शिलेदरांनी मैदान मारलं
शरद पवारांच्या दोन शिलेदारांनी विजय मिळवला. पुणे पदवीधरमधून हर्षदा देशमुख जाधव यांचा मोठ्या मतांनी विजय झाला. तर छत्रपती संभाजीनगर येथून शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय झाला. या दोन्ही मतदार संघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सतिश चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. सलग तीन वेळा ते निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांच्या प्रतापसिंह पाटलांना त्यांनी आस्मान दाखवले आहे.
कराळे मास्तर ठरले गेमचेंजर
नागपूर पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाले असून, शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या या लढतीत त्यांनी वरिष्ठ नेत्यांची मान उंचावत काँग्रेसला विजय मिळवलून दिला आहे. या मतदार संघात नितेश कराळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यावर शरद पवारांच्या पक्षाने कारवाई केली. तरीही त्यांनी निवडणूक लढवली. त्यांना २५ हजार मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत कराळे मास्तर गेमचेंजर ठरले आहेत.
शरद पवार गटाचे कमबॅक
सध्या शरद पवार गटाकडे ८ खासदार, १० आमदार, १ विधानपरिषद आणि आता दोन पदवीधऱ मतदार संघातून आलेले आमदार आहेत. त्यामुळे आता शरद पवार गटाचे बळ साहजिकच वाढले आहे.





