जमावाच्या मारहाणीत दोन पोलिस जखमी
Updated On:

गुवाहाटी : येथे जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाले.
नागाव जिल्ह्यातील मिलनपूर येथे हा प्रकार घडला. हे पोलिस एका घरगुती भांडण्यांच्या तपासासाठी गेले होते. त्यावेळी जमावाने दोन पोलिसांना घेरले.
या दोघांना झाडाला बांधण्यात आले. त्यानंतर त्यांना बेदम झोडपण्यात आले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलिसांना ही बाबा समजताच मोठा फौजफाटा घेऊन जात या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. या पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





