छत्तीसगड मधील चकमकीत दोन नक्षलवादी ठार

बिजापूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना मॅडेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात ही चकमक झाली.चकमक शांत झाल्यानंतर घटनास्थळावरून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.
हे ऑपरेशन अद्याप सुरू असून अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे, असे पेालिसांनी सांगितले. या घटनेमुळे राज्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत यावर्षी आतापर्यंत ११८ नक्षलवादी ठार झाले आहेत.२३ मे रोजी नारायणपूर-विजापूर आंतरजिल्हा सीमेवरील जंगलात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले होते. त्याच्या आधी १० मे रोजी बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले.
३० एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन महिलांसह दहा नक्षलवादी ठार झाले.या अलिकडच्या काळातील काही मोठ्या चकमकी आहेत.





