बिष्णोई गॅंगचे दोन सदस्य अटकेत; जग्गा सिंग, मनजिंदर सिंग आरडीएक्ससह पकडले

Bishnoi Gang | चंडीगडमध्ये आरडीएक्स असलेले इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) जप्त केल्यानंतर दहशतवादी मॉड्यूलच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली. आरोपींची ओळख जग्गा सिंग आणि मनजिंदर सिंग अशी आहे. ते जर्मनीस्थित गुरप्रीत सिंग उर्फ गोल्डी ढिल्लन चालवत असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचे प्रमुख सदस्य आहेत.
ढिल्लन हा गोल्डी ब्रार-लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. ही माहिती पंजाबचे पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी दिली आहे. चंडीगडच्या काउंटर इंटेलिजेंस फिरोजपूरने मोठे यश मिळवले आणि जर्मनीस्थित गुरप्रीत सिंग उर्फ गोल्डी ढिल्लन, जग्गा सिंग आणि मनजिंदर सिंग यांनी चालवलेल्या दहशतवादी मॉड्यूलच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करून या प्रदेशातील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा कट उधळून लावला. Bishnoi Gang |
अटक केलेल्यांकडून २.८ किलो आयईडी, ज्यामध्ये १.६ किलो आरडीएक्स आणि रिमोट कंट्रोल जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, हा आयईडी दहशतवादी हल्ल्यासाठी बनवण्यात आला होता. एनआयएने ढिल्लनवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. Bishnoi Gang |





