Accident News । नांदेडमध्ये क्रुझर गोदावरीत कोसळून दोघांचा मृत्यू
Updated On:

नांदेड– लोहा तालुक्यातील येळी महाटी पुलावरुन एक क्रुझर जीप गोदावरी नदीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे व उद्धव आनंदराव खानसोळे, अशी मृतांची नावे आहेत.
मुदखेड तालुक्यातील शिखांची वाडी येथील उद्धव खानसोळे क्रुझर गाडीचे भाडे सोडून लोहा तालुक्यातील येळी येथील त्यांचा मित्र थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे यांना भेटण्यासाठी दुपारी आला होता.
दरम्यान दोघेही मुदखेडच्या दिशेने जात असताना येळी गावच्या बाजूने असलेल्या गोदावरी नदी पात्राच्या ३० ते ३५ फुट खोल पाण्यात गाडीसह पडून बुडाले.





