बॅगेत 2 खवले मांजर, 35 कासव, 50 सरडे आणि 20 साप आढळल्याने दोन भारतीय महिला अटकेत

बॅंकॉक – बॅंकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळावर प्राण्यांची तस्करी केल्या प्रकरणी दोन भारतीय महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलांकडे असलेल्या बॅगेत 109 जिवंत प्राणी आढळून आले होते. या महिला चेन्नईच्या विमानाने रवाना होणार होत्या.
नित्या राजा आणि जकिया सुल्ताना या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
थायलॅंडच्या राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक्स-रे तपासणीनंतर दोन सुटकेसमध्ये प्राणी सापडले. या बॅगेत दोन पांढरे साळिंदर, दोन खवले मांजर, 35 कासव, 50 सरडे आणि 20 साप आढळले आहेत.
थायलंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राणी सापडेल्या सुटकेस नित्या राजा आणि झाकिया सुलताना इब्राहिम या दोन भारतीय महिलांच्या आहेत.
त्या चेन्नईला जाणाऱ्या विमानात बसणार होत्या. या दोन्ही महिलांना 2019च्या वन्यजीव संरक्षण आणि संरक्षण कायदा, 2015 चा प्राणी रोग कायदा आणि 2017 च्या सीमाशुल्क कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.





