nagar | गुटख्याची वाहतूक करणारे दोघे जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात बंदी असलेला गुटख्याची जामेखेड तालुक्यातील खर्डा येथे विक्री करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून खर्डा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण अशोक बोराडे (वय २९, रा. पाथरुड, ता. भुम, जि. धाराशिव), गणेश सतिष काकडे (वय २१, रा. कुसडगाव, ता. जामखेड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडून २७ हजार रुपयांचा पानमसाला, १८ हजारांचा सुगंधी तंबखू ३५ हजारांचे मोबाईल, २ लाख ३० हजारांची दुचाकी असा एकूण ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर मुद्देमाल हा किरण बोराडे याने समाधान खुळे,(रा. परांडा, जि.धाराशिव) याने पाठविली असुन गणेश काकडे यास विक्री करण्यासाठी या ठिकाणी आणला असल्याचे तपासात पुढे आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार गुटखा गणेश काकडे यास विक्री करण्यासाठी खर्डा ते भुम जाणारे रोडवर, खर्डा गावातील टोलनाक्या जवळ येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकास सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.





