Nagar | बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
Updated On:

राहुरी,(प्रतिनिधी) – तांदुळवाडी शिवारात अविनाश गोरक्षनाथ पेरणे यांच्या दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या. बिबट्याने एक शेळी पळवून नेली. दोन दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला होता.
वनविभागाने घटनेचा पंचनामा केला. अविनाश पेरणे यांची वस्ती मुळा नदीकाठी आहे. परिसरात उसाचे पीक, गिन्नी गवत बिबट्याना लपावयास जागा आहे. पेरणे यांच्या दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्या.
एका शेळीस बिबट्या घेऊन गेला.आदले दिवशी सुराणा यांच्या शेतातील ट्रँक्टर चालकाला बिबट्या दिसला होता.रात्री वीज पुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अपरात्री जावे लागते. वनविभागाने त्वरीत पिंजरा लावावा, अशी मागणी तांदुळवाडी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.





