दहावी परीक्षेत दोन डमी विद्यार्थी सापडले
Updated On:

सातारा : दहावीच्या भूमिती विषयाच्या परीक्षेसाठी डमी बसलेले दोन विद्यार्थी आज सापडले आहे. संबंधितांवर सातारा शहर आणि पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
दहावीच्या परीक्षा सुरु असून, आज भूमिती विषयाची परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान होती. गोडोली येथील यशोधानगरमधील साधना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हा डमी विद्यार्थी सापडला आहे. त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच पाचगणी येथील शाळेत डमी विद्यार्थी सापडला असून, त्याच्यावरही पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.





