Hospital Gate Collapse : मोठी दुर्घटना ..! सरकारी रुग्णालयाची कमान कोसळून २ जणांचा मृत्यू
Hospital Gate Collapse : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या नवीन कमानीचे काम सुरू असताना सोमवारी अत्यंत भीषण दुर्घटना घडली.

Hospital Gate Collapse : मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या नवीन कमानीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगा-याखाली दबले जाऊन २ जणांचा मृत्यू झाला असून ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Hospital Gate Collapse)
मिळालेल्या माहितीनुसार, मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरील मुख्य प्रवेशद्वारावर एका नवीन कमानीची उभारणी केली जात होती. या कमानीवर नवीन स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, काम सुरू असतानाच अचानक हा स्लॅब कोसळला.(Hospital Gate Collapse)
कमान कोसळल्याचा आवाज इतका मोठा होता की, परिसरात एकच खळबळ उडाली आणि मोठा गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने, ढिगा-याखाली अडकलेल्या ५ ते ६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. (Hospital Gate Collapse)
या दुर्घटनेत जवळपास ७ ते ८ कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Hospital Gate Collapse





