Maharashtra Politics : उद्यापासून दोन दिवस मंत्रिमंडळाच्या मॅरेथॉन बैठका; जवळपास ६० विषयांवर निर्णयाची शक्यता

मुंबई – उद्यापासून दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाची मॅरॅथॉन बैठक होणार आहे.उद्या सुमारे ४० तर बुधवारी होणाऱ्या बैठकीचा अजेंडा ठरला नसल्यामुळे १८ते २० विषयांवर त्यातही साधक-बाधक चर्चा होईल. यातील निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ अध्यादेश काढण्यात येतील असे सागण्यात आले.
उद्या दुपारी साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यात सुमारे ४० विषय असल्याचे सागितले जाते. मात्र त्यातही दोनतीन विषय अधिकचे येण्याची शक्यता आहे.तथापि उद्याच्या बैठकीत सर्व विषयांवर खुलेपणे चर्चा होईल असा विश्वास मुख्यमंत्री व सचिव कार्यालयास आहे. परंतु बुधवारच्या बैठकीची वेळ व ठिकाण ठरले असले तरी बैठकीसाठी सातआठ विषय सोडले तर आणखी विषय शोधून काढायला लागतील.
तथापि मंत्रिमंडळाकडून गेल्या दिड महिन्यातील विषयांच्या निर्णयाची गर्दी पाहता महायुती सरकारने निर्णय प्रक्रियेनंतरच्या अंमलबजावणीत शॉर्टकट घेत निर्णयानंतर थेट अध्यादेशच काढावा असा आदेश दिल्याने पुढील मंत्रिमंडळ बैठकात थेट अध्यादेशच काढायचे ठरविण्यात आले. तथापि ही प्रक्रिया वेगाने चालावी असेही मंत्र्यांनी मत व्यक्त केले. परंतु जीआरचे कामच धीम्या गतीने सुरु असल्याचे कळते.
दरम्यान,दोन दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीला सर्व सचिवांनी उपस्थित राहावे असे आदेश पारित करण्यात आल्याचीही चर्चा आज मंत्रालयात होती. तथापि यानंतरही उद्याच्या बैठकीला मुख्य सचिवांचीच दांडी होणार अशी खसपस मंत्रालयात पिकली होती.मुख्य सचिवांच्या खात्याने मात्र असा काही निरोप नसल्याचे स्पष्ट केले.





