Satara news ; जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील शाळांना दोन दिवस सुट्टी

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून, हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड या तालुक्यांमधील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीदेखील दोन दिवस बंद राहणार आहेत.
उर्वरित तालुक्यांमधील पर्जन्यस्थिती पाहून, तेथील शाळा बंद ठेवण्याबाबत तालुकास्तरावर गटविकास अधिकारी निर्णय घेतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक आल्याने धोक्याची शक्यता आहे. ठिकाणी नद्या, नाले, ओढ्यांना पूर हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शिक्षणाधिकार्यांकडून पूर स्थितीचा आढावा घेऊन, पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड या तालुक्यांमधील सर्व शाळा बुधवारी (दि. २०) आणि गुरुवारी (दि. २१) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यांमधील पर्जन्यस्थिती पाहून, संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी निर्णय घेणार आहेत. सुट्टीच्या दिवसाचे कामकाज रविवारी करण्यात यावे, असेही नायकवडी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
माण तालुक्यातील शाळांना आज सुट्टी
हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे माण तालुक्यातील सर्व शाळा बुधवारी (दि. २०) बंद राहणार आहेत. सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची सुरक्षितता घेण्याबाबत शिक्षकांनी पालकांना सुचित करावे, असे आवाहन माण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी केले आहे.





