बोलिव्हियामध्ये दोन बसचा भीषण अपघात; 37 जणांचा मृत्यू

Bolivia Bus Crash | बोलिव्हियामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन बसची धडक झाल्याने यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 39 हून अधिक जण जखमी झाले आहेत. उयुनी आणि कोलचानी दरम्यानच्या महामार्गावर पहाटेच्या सुमारास एक बस चुकीच्या लेनमध्ये गेल्याने हा अपघात झाला.
या अपघातातील जखमींवर उयुनी शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील मृतांची ओळख पटवण्याचं आणि जखमींना मदत करण्याचं काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या अपघातातील एक बस ओरुरो शहराकडे जात होती, जिथे वीकेंड ओरुरो कार्निव्हल आयोजित केला होता. Bolivia Bus Crash |
बोलिव्हिया सरकारच्या मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, या बस अपघाताचं प्रमुख कारण जास्त वेग असू शकतो. तसेच एक बस विरुद्ध लेनमध्ये गेली होती, ज्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या अपघाताची सखोल चौकशी केली जात आहे. Bolivia Bus Crash |
हेही वाचा:
धनंजय मुंडे राजीनामा देणार; करुणा मुंडेंचा दावा, फेसबुक पोस्टद्वारे तारीख केली जाहीर

