धनंजय मुंडे राजीनामा देणार; करुणा मुंडेंचा दावा, फेसबुक पोस्टद्वारे तारीख केली जाहीर

Dhananjay Munde | संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीने जोर धरला आहे. यातच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर ज्यात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला. सोशल मीडिया पोस्टवर करुणा शर्मा यांनी दावा केला आहे.
सोमवारपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधीच मुंडे आपला राजीनामा देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले. करुणा मुंडे यांनी एक सूचक पोस्ट करत त्यात म्हटंल की, 3 मार्च 2025 रोजी राजीनामा होणार आहे. दरम्यान, काल पोलिसांच्या आरोप पत्रात वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनामाची मागणी वाढत आहे. अशातच करुणा मुंडे यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
‘दोन दिवसांआधी मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला ‘
करुणा शर्मा यांनी म्हटले की, “मला आतून माहिती मिळाली, दोन दिवसांआधी त्यांचा राजीनामा लिहून घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: सांगितले होते की वाल्मिक कराड चौकशीअंती दोषी निघाला तर मी स्वत: राजीनामा देईल. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसल्याने सोमवारी अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा शंभर टक्के होणार आहे. अजित पवार अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणार आहेत.” Dhananjay Munde |
संतोष देशमुख यांची इतकी निर्घृण हत्या केली गेली, अशी हत्या महाराष्ट्रात आतापर्यंत कधी झाली नाही, त्यासाठी मी मागणी करते, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असेही करूणा मुंडे यांनी म्हटले आहे. अद्याप राष्ट्रवादी पक्षाकडून मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु करुणा मुंडे यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Dhananjay Munde |
हेही वाचा:





