Maharashtra Byelection 2026 : महाराष्ट्रातील दोन विधानसभेच्या जागा रिक्त; पोटनिवडणूक कधी होणार? मोठी अपडेट समोर
Maharashtra Byelection 2026 : राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची घोषणा कधी होणार यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Maharashtra Byelection 2026 : महाराष्ट्रातील दोन विधानसभेच्या जागा रिक्त आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त आहे, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळी ही जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
येत्या काही दिवसांत पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याचवेळी बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोटनिवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी स्विकारली. मात्र, नियमानुसार सहा महिन्यांत विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य असणे अनिवार्य आहे. पण सध्या यापैकी कोणत्याही सभागृहाच्या सदस्या सुनेत्रा पवार नाहीत. त्यामुळे बारामती पोटनिवडणूक त्या लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
राहुरीतून कोण लढवणार पोटनिवडणूक? Maharashtra Byelection 2026

Maharashtra Byelection 2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अॅाक्टोबर २०२५ मध्ये निधन झाले. तेव्हापासून राहुरी विधानसभेची जागा रिक्त आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





