लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर विकणाऱ्या दोघांना अटक

Updated On:
लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर विकणाऱ्या दोघांना अटक

नवी दिल्ली – लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे चित्रिकरण समजामाध्यमांद्वारे विकणाऱ्या दोघांना केंद्रीय अन्वेषण पथकाने अटक केली, अशी माहिती रविवारी देण्यात आली. लहान मुलांच्या लैंगिक शोषण थांबवण्यसाठी निर्माण केलेल्या विशेष पथकाने शिक्षणाने अभियंता असणाऱ्या निरजकुमार यादव आणि कुलजितसिंह माकन यांच्या मुसक्‍या आवळल्या.

त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 22 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे सीडी विकायची असल्याची जाहिरात या दोघांनी समाज माध्यमांद्वारे दिली होती. ते पेटीएम आणि गुगल पे सारख्या ऍपचा वापर करून पैसे स्वीकारत होते, असे सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी सांगितले.

ते म्हणाले, या प्रकरणी सीबीआयने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. त्यात या व्यक्तीने असल्या अश्‍लील चाळ्यांच्या चित्रिकरणाचा मोठा साठा करून ठेवला होता. त्याला पेटीएमने पैसे मिळाल्यानंतर तो हे चित्रिकरण पाठवत असे. 2019 पासून त्याचे हे उद्योग सुरू होते. पैसे मिळाल्यानंतर तो इन्स्टाग्राम, व्हॉटस्‌ ऍपने हे आक्षेपार्ह साहित्य पाठवत असे.

आणखी संबंधित बातम्या

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

2026-10-08 19:31:12

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी

2026-10-08 16:18:58

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी

Shiranthi Rajapaksa : श्रीलंकेच्या माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे यांना अटक

2026-10-07 19:17:43

Shiranthi Rajapaksa : श्रीलंकेच्या माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे यांना अटक

Kiara and Sidharth Malhotra : कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

2026-10-07 12:00:00

Kiara and Sidharth Malhotra : कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी साधला निशाणा

2026-10-07 09:35:12

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी  साधला निशाणा